हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
भावी उमेदवार डॉ. ओंकार राठोड यांचा जनसंपर्क दचिखली पोलिसांची मोठी कारवाई! डिझेल चोरी करणाअपघात की घातपात? बेपत्ता दांपत्याची कार बंद वलाडकी बहीण योजना: 2 मिनिटांत मोबाईलवर घरबसल्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेने चिBreaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याच

छत्रपती संभाजीनगरहून नोकरीच्या मुलाखतीवरून परतणाऱ्या नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा लोणी-लोणार रोडवर बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू.

On: November 29, 2025 2:49 PM
Follow Us:
नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू घटना

नारायणराव आरु पाटील/रिसोड

नोकरीच्या मुलाखतीवरून परतणाऱ्या नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू ही घटना रिसोड तालुक्यात हळहळ पसरवणारी ठरली. छत्रपती संभाजीनगरहून घरी परतत असताना नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू लोणी-लोणार रोडवर अचानक घडला.
या भीषण अपघातामुळे नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू हा शब्दशः गावाला हादरा देणारा प्रसंग ठरला. गावात सर्वत्र एकच चर्चा — नवविवाहित 26 वर्षीय तरुणाचा बोलेरो पिकअपच्या धडकेत मृत्यू कसा आणि का घडला?वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलू खडसे येथील 26 वर्षीय केशव पंजाबराव खडसे हा 24 नोव्हेंबर रोजी नोकरीच्या मुलाखतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता.
मुलाखत पूर्ण झाल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तो आपल्या भावासह घरी जात होता. लोणारवरून दोघेही लोणी मार्गे दुचाकीने शेलू खडसेकडे निघाले होते. जांबुल क्रॉसिंगजवळ त्यांनी बाईक कडेला उभी करून थांबले असताना ही दुर्घटना घडली.याच वेळी लोणीकडून येणारी बोलेरो पिकअप (क्रमांक MH 28 BB 4553) वेगाने समोरून आली व चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट दुचाकी जवळ उभ्या केशव खडसे यांच्यावर जोराने आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की तो काही फुटांवर फेकला गेला व गंभीर जखमी झाला.
काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.जखमी तरुणाला तात्काळ रुग्णवाहिकेतून लोणार ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर बोलेरो पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून लोणार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा.अनेक जिल्ह्यांत मोटरसायकल चोरी करणारा कुख्यात चोरटा चिखली पोलिसांच्या जाळ्यात; युनिकॉर्न बाइकही हस्तगत.मृत केशव खडसे याचे लग्न अवघे सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. नोकरीच्या आशेने मोठ्या उत्साहाने तो मुलाखत देऊन परतत होता. परंतु या दुर्दैवी घटनेमुळे शेलू खडसे गावात शोककळा पसरली आहे.

👉 ताज्या ब्रेकिंग घटना, लाइव्ह अपडेट्स आणि परिसरातील महत्वाच्या बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in फॉलो करा.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!