Nagarpalika 2025 निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका 2025 साठी अभूतपूर्व नामांकन दाखल झाले आहे.
शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
एकूण पाहता Nagarpalika 2025 निवडणूक प्रक्रियेत जिल्हाभरात १३४ नगराध्यक्ष आणि तब्बल २५४१ नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात ११ नगरपालिकांमधून उमेदवारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला असून शेवटच्या दिवशी अक्षरशः नामांकनाचा ‘पोळा’ फुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशी उमेदवार निश्चित केल्याने कार्यालयांमध्ये झुंबड उडाली.
🔴Nagarpalika 2025: १३४ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज
जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव आणि सिंदखेडराजा या ११ नगरपालिकांतून एकूण १३४ अध्यक्षपदाचे अर्ज दाखल झाले.
🔴Nagarpalika 2025: २५४१ नगरसेवक अर्जांनी रेकॉर्ड
नगरसेवक पदांसाठी बुलढाणा २४६, चिखली २६९, देऊळगावराजा १६८, जळगाव जामोद १६७, खामगाव २०२, लोणार २२७, मलकापूर ३५९, मेहकर ३२५, नांदुरा २०५, शेगाव २६७ तर सिंदखेडराजा १०६ अर्ज दाखल झाले.
नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर निवडणुकीच्या पुढील टप्प्यांना सुरुवात होणार आहे.










