mumbai news | प्रेमभंगातून प्रियकराने भरदिवसा केली तरुणीची हत्या.

mumbai news
mumbai news

 

 

mumbai news : प्रेमभंगातून प्रियकराने भरदिवसा केली तरुणीची हत्या. प्रेमप्रकरणातून प्रियकराने भरदिवसा रस्त्यावर आपल्याच प्रेयसीची लोखंडी पान्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी वसईत घडली.आरती रामदुलार यादव (२२) ही गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जात होती. तेवढ्यात रोहित रामनिवास यादव (२९) याने लोखंडी पान्याने तिच्या डोक्यावर १५ ते १६ वार केले.

 

 

ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतरही आरोपी रोहित वार करीतच राहिला. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दोघांमध्ये ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते; महिनाभरापासून तिचा संशय येत असल्याने, ब्रेकअप झाल्याने रोहितने रागाच्या भरात हे कृत्य केले.

 

 

हत्या केल्यानंतर जवळ बसून राहिला

 

रक्ताच्या थारोळ्ळ्यात आरती कोसळल्यानंतरही माथेफिरू तरुण तिच्यावर वार करीत होता. हत्या केल्यानंतर तो मृतदेहाजवळच बसून राहिला होता. वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

 

mumbai news : एकही समोर आला नाही.

 

तरुणीची हत्या होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. अनेक जण गाड्या उभ्या करून हे दृश्य पाहत होते, तर काहींनी आरोपीला रोखण्याऐवजी घटनेचे चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. एका तरुणाने या माथेफिरूला अडवण्याचा प्रयन केला, मात्र आरोपीने त्याच्याकडे लोखंडी पान्हा रोखल्याने तो मागे हटला.