मेहकर/प्रतिनिधी
mehkar : रस्त्यावर वाहन लावण्यास मज्जाव केल्याने पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून सहा जणांनी हात मुरगळला. तसेच धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मेहकर mehkar येथे ७ ऑक्टोबरच्या रात्री आठ वाजता ही घटना घडली. मेहकर mehkar येथे वाटिका चौक ते नगर परिषद, तहसील चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एपीआय बाजड यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी वाहने बाजूला घेण्यास सांगत होते. त्याचवेळी एमएच- २८-बीके-६२०६ क्रमांकाच्या इर्टिगामधील आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. पोलीस उपनिरीक्षक गणेश भगवान कड ganesh bhagwan kad यांनीदेखील आरोपींना वाहन काढण्यास सांगितले.
त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी कड यांची कॉलर पकडली. तसेच लोटपाट केली. वर्दीवरील बटन व नेमप्लेटही आरोपींनी तोडली. या प्रकरणी अमोल सीताराम म्हस्के (३५), विनय दिगंबर धोंडगे (४१), रामेश्वर शामराव जाधव (४८) तिघे रा. ब्रह्मपुरी (ता. मेहकर), विजय मोहन चव्हाण (३०, हिवरा आश्रम ता. मेहकर), सचिन बबन सरकटे (२६, शेलगाव काकडे ता. मेहकर) व निखील समाधान पवार (२७, दुधा ता. मेहकर) या आरोपींविरुद्ध मेहकर पोलिसांत कलम १३२, १२१, (१), ३५१ (२), १८९ (२), १९१ (२), १९० भारतीय न्याय संहिता सन २०२३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
‘सर्व पोलीस माझ्या खिशात !’
येथे गाडी लावली तर तुला काय प्रॉब्लेम आहे, असे आरोपी उद्धटपणे बोलले. तरीही पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जे करायचे ते करून घे, सर्व ‘पोलीस माझ्या खिशात’ आहेत, अशा धमक्या आरोपी अमोल म्हस्के याने दिल्या.