तरुणाचा जागीच मृत्यू झाला.परिसरात मेहकर-लोणार महामार्ग अपघात या शब्दाचे खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून
स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला.ही घटना चिंचोली बोरे फाटा परिसरात दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
मेहकरहून लोणारकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे वारंवार लक्षात येत असले तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही. आजही त्याच भेगांमध्ये दुचाकीचे टायर अडकल्याने 15 वर्षीय राहील खान (राहणार मिलिंद नगर, मेहकर) हा आपल्या मित्रासोबत मोटारसायकल क्रमांक MH 1212 AG 2629 ने येत होता.रस्त्यातील खोल भेगेत टायर गेल्याने दोघेही खाली कोसळले.
घटनेच्या वेळी जालना येथून मेहकरकडे जाणारा ट्रक भरधाव वेगात येत होता.
ट्रकचालकाने दुचाकीस्वारांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात तो ट्रक खाली आल्याने राहील खानचा जागीच मृत्यू झाला.
हे पण वाचा.
तर त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारांनंतर संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनावर कठोर टीका केली आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या अपघातानंतर महामार्गावर पथदर्शी दुरुस्ती, मोठ्या भेगांचे काम आणि ट्रॅफिक व्यवस्थापनाची मागणी जोर धरत आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.
📌 वाचकांसाठी महत्त्वाचे
👉 अशाच स्थानिक अपडेट्स, अपघात माहिती, ब्रेकिंग न्यूज आणि सरकारी घोषणांसाठी
KattaNews.in ला नियमित भेट द्या.
👉 हा लेख शेअर करून इतरांना सावध करा — तुमचा एक शेअर एखाद्याचा जीव वाचवू शकतो.
📎 Related News











