मेहकर शहर/प्रतिनिधी
मेहकर येथील सराफा लाइनमधील एका सोन्याच्या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत सोने चांदीचे सुमारे १३ लाख २१ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीं च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर येथील कैलास कमलनयन धानुका यांचे सराफा लाईनमध्ये मथुरा ज्वेलर्स चे दुकान आहे. या दुकानात दोन पुरुष कामाला आहे. २२ ऑगस्टला दुकान मालक कैलास धानुका व कामावरील माणसांनी रात्री ८ वाजता दुकान बंद केले. त्याआधी धानुका यांनी काही दागिने सोबत घेतले व बाकी दागिने काचेच्या रॅक मध्ये ठेवले. २३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुकान बंद होते. २४ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजता घरा शेजारील गोविंद अग्रवाल यांनी कैलास धानुका यांना फोन करून दुकानाचे शटर उघडे असल्याचे सांगितले. धानुका
तात्काळ दुकानाजवळ गेले त्यांनी बघितले असता त्यांना ही शटर उघडे दिसले. दुकानात आत जाऊन बघितले असता चोरी झाल्याचे दिसले. अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोरणी वजन ३५ ग्रॅम किंमत २ लाख ५५ हजार ५०० व चांदीचे दागिने यात चेनपट्टी, तोरड्या, छंद, बिल्ले, बाळेज गोडवे, कडे, अंगठ्या, बिचवे, ब्रासलेट, गळ्यातील चेन, देवाच्या मुर्त्या, वाटी, चमचे, निरंजनी, करंडे असे १३ किलो वजनाचे १० लाख ६६ हजार रूपयांचे दागिने व सर्व मिळून १३ लाख २१ हजार ५०० रूपयांचे दागिने लंपास केले आहे.
घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम प्रभारी पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, वसंत पवार, पोलीस कर्मचारी प्रभाकर शिवणकर, विजय बेडवाल, इब्राहिम परसुवाले, समाधान अरमाळ, चालक संदीप भोंडाने तसेच फिंगर प्रिंट पथक, स्थानिक गुन्हे अन्व्हेशन चे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, शरद गिरी यांच्या पथकाने भेट दिली आहे.