गेली तीन ते चार दिवस झाले पावसाने थैमान घातले अशातच रोडवर होणारा अपघातात वाढ होत आहे. जिल्ह्यामध्ये दररोज नवीन अपघात घडून येत आहेत.अशातच लोणार कडून मेहकर (mehkar) कडे जाणारी काळी पिवळी क्र. MH37 B.6234 क्रमांकाची गाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी गाडीमध्ये बसलेले असताना ही गाडी अतिशय वेगाने प्रवाशांच्या जीवाशी खेळून भरधाव वेगाने जात होती.
या गाडीमध्ये महिला प्रवासी ह्याच जास्त प्रमाणात होत्या सुलतानपूर मेहकर रोडवर गारवा धाब्याच्या काही अंतरावर या गाडीने प्रवाशांच्या जीवाशी खेळत पलटी मारली.यामध्ये अनेक महिला गंभीर जखमी झाल्या असून काही अल्पवयीन मुली सुद्धा गंभीर जखमी आहेत परंतु कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही गाडीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवाशांना गंभीर मारा असून कुठले प्रकारे जीवित हानी झालेली नाही पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.