Manoj jarange patil latest news : २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर उमेदवार पाडु !

Manoj jarange patil latest news

Manoj jarange patil latest news : मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. राज्य सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू, असा सज्जड इशारा मराठा आरक्षणाचे maratha reservation नेते मनोज जरांगे- पाटील यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

 

 

पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानंतर मनोज जरांगे-पाटील manoj jarange patil हे छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकारनेच १३ टक्के आणि १६ टक्के आरक्षण दिले होते ते आता टिकले नाही. आता १० टक्के दिले. त्या अगोदर कोर्टात याचिका दाखल केल्या गेल्या. मराठा समाजाला गोड बोलून डाव टाकला असल्याचे दिसते. ‘मराठा आणि ओबीसी’ वाद सरकारने लावल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

 

 

आमचे विरोधक भुजबळ

लक्ष्मण हाके हे वडिगोद्री येथे मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करीत आहेत. यासंदर्भात जरांगे म्हणाले मराठा समाजाचे विरोधक हाके नाहीत, तर मंत्री छगन भुजबळ Chhagan bhujbal आहेत. मी एकाही धनगर नेत्यांना बोललो नाही. त्यांना विरोधक मानले नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांवर टीका केली.