Maharashtra police : जिद्दीच्या जोरावर गरिबा घरची पोरं बनली महाराष्ट्र पोलीस.

 

प्रदिप देशमुख / प्रतिनिधी 

 

श्रद्धा लामतुरे हिची महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) म्हणून पुणे येथे निवड झाली .वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मसनी या गावातील रहिवाशी आहे या गावातील संपूर्ण नागरिक हालाखिच्या परिस्थितीत जगतात. गोरगरीब लोक मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत आहे.आणी मुला- बाळासाठी शिक्षणवर काही पैसा खर्च करतात त्या गावातील गरीब कुटुंबातील मुलगी श्रद्धा लामतुरे हिने स्वतःच्या जिद्दीने मेहनत करून पुणे येथे महाराष्ट्र पोलीस म्हणून श्रद्धाची निवड झाली आहे.

 

 

 

तिच्या कष्टाचे फळ पाहून पंचशील मित्र मंडळाने तिचा सत्कार समारंभ आयोजित केला. श्रद्धाच्या आईचाही सत्कार गावातील प्रतिष्ठित नागरिक राजूभाऊ दिघडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी गावातील मजूरदार वर्ग आणि प्रतिष्ठित गावातील मंडळींच्या उपस्थितीत इतर तरुण राहुल वरघट, निलेश वरघट, आशोक वरघट, दिलीप, विवेक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

 

 

 

यावेळी सामाजिक प्रबोधनकार राम नाखले यांनी शिक्षण, आरोग्य रोजगार यावर सत्कार प्रसंगी प्रबोधन केले असेच गावातील मंडळींनी शिक्षण घेऊन मोठ-मोठे अधिकारी पुणे मुंबई शहरामध्ये असायला पाहिजे असे सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे.