लोणार : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे मानव विकास कॅम्प शिबिर यशस्वी पार पडले.

 

लोणार

 

 

भागवत आटोळे/प्रतिनिधी,बिबि

 

लोणार : लोणार तालुक्यातील किनगाव जटुटु येथे मानव विकास कॅम्प शिबिर यशस्वी पार पडले…बुधवार दिनांक 9.10.2024 ला प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी पिसा अंतर्गत उपकेंद्र किनगाव जटुटु येथे kingaon jattu मानव विकास शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे उदघाटन किनगाव जटुटुचे प्रथम नागरीक सरपंच शारदाबाई माहाजन यांच्या हस्ते करण्यात आले 48 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली तसेच 0 ते 6 महीण्यांचे एकून 41 बालकांची तपासणी बालरोग तज्ञ यांच्या कडुन करून घेण्यात आली.

 

 

 

शिबीराचे आयोजन डॉ.अमोल शिपे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.बुलढाणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालशेटवार मॅडम डॉ.वैभव मापारी वैधकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र शिवणी पिसा यांच्या मार्गदर्शना खाली ‘मानव विकास’ शिबीर राबविण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी नारायण सानप आरोग्य सेवक पी.डी.चव्हाण आरोग्य सेवक झगरे,खडागळे ,सपकाळ,तसेच आशा गटप्रर्वतक व आशा सेवीका व प्राथमी केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले श्रिमती राठोड ताई आरोग्य सेविका व श्रिमती अवसरमोल यांनी फार मोलाचे सहकार्य केले व शिबीर यशस्वी पार पडले.