latest news : लघवी अंथरुणात केली म्हुणून आईने दिले मुलीला चटके

latest news

latest news : अंथरुणात ‘लघवी’ केल्याच्या रागातून आईने नऊ वर्षांच्या मुलीला चटके दिल्याची घटना रविवारी गोवंडीमध्ये gowandi घडली. कोहिनूर खातून खान kohinur khatun khan (३२) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गोवंडी-बैंगनवाडी gowandi baiganwadi  येथील मोहम्मद चांद शेख mohammad chand shekh यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपी कोहिनूर खातून यांचे दोन विवाह झाले असून, ती दुसऱ्या पतीसोबत राहते.

 

 

 

 

तिला पहिल्या पतीपासून १२ आणि नऊ वर्षांच्या दोन मुली, तर दुसऱ्या पतीपासून पाच वर्षांचा मुलगा आणि आठ महिन्यांची मुलगी आहे. रविवारी सकाळी नऊ वर्षांच्या मुलीने अंथरुणात लघवी केल्याने कोहिनूर खातूनने kohinur khatun तिला बेदम मारहाण केली आणि पळी गॅसवर गरम करून तिला चटके दिले. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्या किंकाळ्यांनी घर मालकिणीसह शेजाऱ्यांनी मुलीच्या मदतीसाठी धाव घेतली. पण, तिने त्यांच्याशी वाद घातला. तेव्हा मोहम्मद शेख यांनी शिवाजी नगर shivaji nagar पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केले.