latest news : नुकताच प्रेमविवाह आणि तिने केली आत्महत्या !

latest news

latest news : गुजरात येथील तरुणाशी ‘प्रेमविवाह’ केल्यानंतर त्याच्या अनन्वित छळामुळे ती अमरावतीत परतली. येथे माहेरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ८ मे रोजी सायंकाळी ५:४५च्या सुमारास दंडे प्लॉट येथे ती घटना घडली होती. ज्योती मितेश दाभी (३०), असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ३ जुलै रोजी आरोपी पती मितेश ईश्वरभाऊ दाभी (३२, रा. मनीनगर, अहमदाबाद, गुजरात) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

 

 

 

येथील दंडे प्लॉट भागात राहणाऱ्या ज्योतीला आरोपीने प्रेमजाळ्यात ओढले. तिच्याशी प्रेमविवाह केला. तो तिला गुजरातमधील अहमदाबाद येथे घेऊन गेला. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर आरोपी मितेशने mitesh  कुठलाही कामधंदा न करता तिला पैसे आणण्याकरिता मारहाण करू लागला. पैसे आण नाहीतर जिवाने मारतो, अशी धमकी त्याने तिला दिली. त्या त्रासाला कंटाळून ती दंडे प्लॉट येथील माहेरी आई- वडिलांकडे आली. ती माहेरी परतल्यानंतरही त्याने तिला वारंवार कॉल करून धमक्या दिल्या. त्यामुळे ती हतबल झाली.

 

 

 

आरोपी पती मितेशच्या अत्याधिक त्रासामुळे अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आरोपीनेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी फिर्याद मृताच्या आईने नोंदविली. त्या तक्रारीची संपूर्ण चौकशी व संबंधितांचे बयान घेऊन याप्रकरणी ३ जुलै रोजीअखेर गुन्हा दाखल 3 करण्यात आला.