latest crime news : मंगरूळपीर mangalurpir येथील एका महिला ‘शिक्षिकेवर अत्याचार’ केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवार, २९ जुलै रोजी रात्री एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान घडल्याचे पोलिसांकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. एका ४२ वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा आशय असा की, आरोपी विष्णू प्रल्हाद चव्हाण (वय ५३ वर्षे), रा. पिंपळगाव इजारा, ता. मंगरूळपीर याने त्याच्या दारूच्या दुकानात पन्नास टक्के हिस्सेदार बनवणार, असे आश्वासन दिले होते.
त्यासाठी पाच बँक चेक व फिर्यादीच्या आधार कार्डची झेरॉक्स आवश्यक असल्याचे सांगत फिर्यादीकडून तिच्या पंजाब नॅशनल बँकेच्या panjab national bank वाशिम शाखेचे तीन चेक व अॅक्सिस बँकेच्या axis bank वाशिम शाखेचे दोन चेक असे एकूण पाच चेक फिर्यादीची स्वाक्षरी करून घेतले. त्यांनतर त्याने त्याच्या बहिणीची स्वाक्षरी घेण्यासाठी, तसेच तिच्या बोलणे करण्यासाठी मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार shelubajar येथे जायचे असल्याचे सांगत फिर्यादीला दुचाकीने शेलूबाजार येथे नेले. त्यानंतर त्याने फिर्यादीला कारंजा मार्गावर असलेल्या एका इमारतीत नेऊन एका खोलीत बसविले आणि बहिणीला घेऊन येतो असे सांगत निघून गेला. परत आल्यानंतर त्याने लैंगिक शोषण करून अनैसर्गिक अत्याचार केले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६, ३७७, ४२०, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.