नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी
लाडक्या बहिणीसाठी शासनाने केली घाई, पण लाडक्या बहिणी (Ladki bahin) आल्या हातघाईवर सविस्तर वृत्त असे की वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी महिलांमध्ये वादावादी तर कॅशियर सोबत भांडण सविस्तर वृत्त असे आहे की आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान बँकांमध्ये लाडक्या बहिणीचे महिला पैसे काढण्यासाठी बॅंकेत तुफान गर्दी झाली.
असून शाखेचा कॅशियर मागून आलेल्या महिलेला पैसे विड्रॉल करून देत आहे अशा भावना निर्माण झाल्याने महिलांमध्ये बोलचाल झाली असून त्यांचे वादात रूपांतर होता होता होऊ नये म्हणून बँक प्रबंधक अवचार यांनी मध्यस्ती केली.परंतु महीला ऐकायला तयार नाही. त्यामुळे त्रस्त होऊन शाखाधिकारी यांनी आपली कॅबिन धरली. अशा प्रकाराला बँकेचे सर्वच कर्मचारी त्रस्त झाले असून हे गाऱ्हाने कोणाकडे मांडावे हे कोणत्याही कर्मचाऱ्याला समजेना.
असे प्रकार रोज बँकेत घडत असल्याने इतरही ग्राहक त्रस्त होत आहेत.आज महिलांची एवढी तुडुंब गर्दी होती की बँकेत उभे राहायला जागा नाही आणि बाहेरही बसायला पाहिजे तशी जागा नसल्याने लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी सर्व कामे सोडून ह्या महिला बँकेत एकाच दिवशी यायला लागल्या. कोणतीही महिला ऐकायला तयार नाही.