रिसोड,शहर प्रतिनिधी/प्रदीप देशमुख
रिसोड – कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी विष्णुपंत भुतेकर यांची निवड झाल्याबद्दल बिनविरोध निवड झाल्याबद्दल निवड माजी खासदार व माजी मंत्री अनंतरावजी देशमुख या गटाचे दहा सदस तर झनक गटाचे आठ सदस्य असून. सहा ते सात महिने अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये सभापती झनक गटाचे झाले होते. व त्यांच्यावर अविश्वास आणून परत विष्णुपंत भुतेकर हे भूमिपुत्र गटाचे असून. त्यांनी दहा सदस्य अनंतराव देशमुख गट मिळून सर्व सदस्य 18 असून सर्वांच्या सहमतीने त्यांची बिनविरोध निवड केली. व उपसभापती यांच्यावर अविश्वास आणून पुढील निवडणूक उपसभापतीसाठी बाकी आहे.
व झनक गटाचे आठ व अनंतरावजी देशमुख यांच्या गटाचे दहा असे मिळून 18 सदस्य आहेत. परत होणाऱ्या उपसभापती हे कोण होणार याची चर्चा नागरिकांमध्ये पुढे चालू आहे. पुढील कामकाज हे सुरळीत चालावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जर असे झाले तर नागरिकांमध्ये सर्वात मोठी चर्चा म्हणजे कधी कोण होईल असा प्रश्न लोकांच्या जिव्हारी लागत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा कुठली निवडणूक असो लोकांमध्ये अशी चर्चा आहे. की सहा सहा महिन्याला सुद्धा सभापती व उपसभापती बदलल्या जातात त्यामुळे लोक असे बोलतात की सहा महिन्याला निवडणूक आता चालू झालेली आहे. व पुढील कार्यकाल हा चांगला चालावा अशी लोकांची अपेक्षा आहे.