वाशीम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील
रिसोड (risod) तालुक्यातील अनेक रस्ते खडीकरणापासून व डांबरीकरण होण्यापासून वंचित आहे कित्येक वर्ष त्या गावात राहणाऱ्या लोकांनी खराब झालेल्या रस्त्यावरून प्रवास करायचा ! तसेच कोठा ते येवता या रस्त्यावर अनेक खड्ड्यात अनेक खड्डे पडले असून या रस्त्याची दुरावस्था खूपच खराब झालेली आहे.हरिबापूच्या नावाने नामांकित असलेली कोठा भूमी येथील हरि बापू संस्थान व येवता येथील सिद्धेश्वर संस्थान
या दोन्ही संस्थानला जोडणारा रस्ता हा दोन्ही संस्थांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ये-जा करतांना त्रास होत आहे, तो दूर व्हावा. यासाठी राजकीय अनास्था दूर ठेवून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी रास्त मागणी कोठा येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश बोरकर व ठेवता येथील कैलास इढोळे यांनी गावात चर्चे दरम्यान बोलतांना व्यक्त केली आहे.