khamgaon : सासू सासऱ्याने मुलात असलेली कमी लपवली ; आणि दिराने केला लैंगिग अत्याचार !

khamgaon

khamgaon : आरोपी पतीने पीडितेसोबत रितीरिवाजाप्रमाणे विधिवत लग्न केले. सात जन्म सोबत राहण्याचे वचनही पत्नीला दिले. मात्र, लग्नानंतर बरेच महिने उलटूनही पत्नीला शारीरीक सुखापासून वंचीत ठेवले. पीडितेने अनेकदा ही बाब सासु-सासऱ्यांच्या कानावर घातली. मात्र, त्यांनी तीच्या बोलण्याकडे कानाडोळा करत मुलातील कमीपणाला बगल दिली. दरम्यान, नियत फिरलेल्या पीडितेच्या दिराने घरात कोणीच नसल्याची संधी साधून पीडितेवर अर्थात सख्या भावजाईवर बळजबरीने ‘लैंगिक अत्याचार’ केला. नव्हेतर या अत्याचारातून गर्भवती राहीलेल्या पीडितेने मुलीस जन्म दिला. समाजात बदनामी होऊ नये, म्हणून पीडितेच्या सासरकडील मंडळीने दिरासोबत तीचे लग्न लावून दिले.

 

 

 

काही दिवस पीडितेचा उपभोग घेतल्यानंतर निरागास बाळासह पीडितेला वाऱ्यावर सोडून दिर पुण्यातून पसार झाल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अमडापूर amdapur पोलिसांत चार जणांविरुध्द लैंगिक अत्याचारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडितेचा विवाह १५ एप्रिल २०२० रोजी मंगरूळ नवघरे mangrul navghire (ता.चिखली) येथील विपिन दत्तात्रय नांदे vipin dattatray nande  याच्यासोबत विधिवत झाला होता. पीडितेला पती, तीन दिर, सासु आणि सासरे असून एक दिर संभाजीनगर, दुसरा गावातच विभक्त तर तीसरा दिर, पीडिता, पीडितेचा पती व सासु-सासरे हे एकत्रित वास्तव्यास आहेत. लग्नानंतर पीडिता रिवाजाप्रमाणे सासरी नांदायला गेली. मात्र, पहिल्याच दिवसापासून पीडितेच्या पतीने तीच्यासोबत शारीरीक अंतर ठेवले.

 

 

 

काही दिवस त्याचा विरह सहन केल्यानंतर पीडितेने ही बाब आपल्या सासूच्या कानावर घातली, मात्र, सासुने आपल्या मुलात असलेली कमी लपविण्यासाठी तीच्या बोलण्याला बगल दिली. तीन-चार महिने उलटूनही पती प्रेम द्यायला तयार नसल्याने पीडिताने पुन्हा सासूच्या कानावर घातले असता, पती, सासु, सासरा व दिराने पीडितेस मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून तोला घराबाहेर काडून दिले. त्यामुळे पीडिता तीच्या माहेरी आई-वडिलांकडे निघुन गेली. पंधरा दिवसानंतर लहान दिर योगेश नांदे yogesh nande हा मोटारसायकलने पीडितेला घ्यायला तीच्या माहेरी गेला.

 

 

 

सासरच्या मंडळींना झालेल्या चुकीचा पश्चाताप झाल असेल, आता तरी माझ्या सोबत चांगले वागतौल, पतीला समजावून सांगतील, या आशेने पीडिताही मोठ्या खुशीत दिरासोबत माहेरी जाण्यास निघाली. तेव्हा माझा भाऊ माणसात नाही, म्हणून तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तुम्ही मला खूप आवडता, माझ्या भावाची कमी मी पूर्ण करतो’, असे दिर पीडितेस म्हणाला. त्याचे बोलने ऐकुन पीडिताने तुम्ही माझे दिर आहात, तुम्हाला असे बोलणे शोभत नाही’, असे म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार सासू आणि पतीला सांगितला, मात्र, त्यांनी पीडितेस शिवीगाळ केली. तसेच ही गोष्ट माहेरच्या लोकांना सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली.

 

 

 

त्यामुळे पतीचा विरह, सासु-सासऱ्यांकडून होणारा शारीरीक व मानसिक छळ निमुटपणे सहन केला. दरम्यान, ऑगस्ट २०२० पीडिता घरात एकटीच असल्याची संधी साधून तीच्या लहान दिर योगेशने तीच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार atyachar केला. ही बाब सासू व पतीच्या कानावर घालुनही त्यांनी पीडितेला मारहाण करत आरोपी योगेशची पाठराखन केली. त्यांनतरही त्याने वारंवार पीडितेच्या शरीराचे लचके तोडले. नव्हेतर यातून पीडिता गर्भवती राहून ११ सप्टेंबर २०२१ रोजी तीला मुलगी झाली. तुझी मुलगी आम्ही स्वीकारतो, पण तुझा पती माणसात नाही, हे कोणाला सांगू नको. मुलगी योगेशची असल्याने आता योगेश बरोबर लग्न करायचे’, असी धमकी देत तीचा वारंवार छळ केला.

 

 

 

 

त्यामुळे पीडिता माहेरी निघुन गेली आणि घडलेला प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातला. त्यांनी सासरच्या मंडळीची बैठक बसवून १० जानेवारी २०२४ रोजी खामगाव येथील रेणुका देवी मंदिरात renuka devi mandirat योगेशसोबत पीडितेचे लग्न लावून दिले. लग्नानंतर आरोपी योगेश पीडितेला घेऊन पुणे येथे गेला. काही दिवस सोबत राहील्यानंतर १७ मे २०२४ रोजी कामाला जात असल्याचे सांगुन पोडिता व तीच्या बाळाला वाऱ्यावर साडून पुणे येथून फरार झाला. या प्रकरणी पीडितेने अमडापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी विपिन दत्तात्रय नांदे, छाया दत्तात्रय नांदे, दत्तात्रय पुंडलिक नांदे आणि योगेश दत्तात्रय नांदे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६ (२) (न), ४९८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस अंमलदार चोपडे chopde हे करीत आहेत.

 

 

 

मुलीसह स्विकार अन् पुन्हा फरार

दरम्यान, पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. यातून तीला एक मुलगी झाली. समाजात होणारी बदनामी लपविण्यासाठी आरोपी योगेशने सख्या भाऊजाईसोबत लग्न केले. पीडिता व निरागस मुलीला घेऊन पुणे येथे राहायला गेला. काही दिवस सोबत राहील्यानंतर एकेदिवसी त्या माय-लेकीला वाऱ्यावर सोडून पुणे येथून फरार झाला.