नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
दि.३० आॅगस्ट रोजी दुपारी १२वा आयोजीत कार्यक्रमात भापूर ता.रिसोड येथील जि.प.शाळेत शिक्षण घेतलेले व शेतकरी कुटुंबात जन्मलेले शिवाजी रामजी बोडखे (इंजिनीयर) यांनी आपले बालपणीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. येथे वर्ग १ते ४पर्यंत आहेत.सद्या शिवाजीराव बेंगलोर येथील चांगल्या कंपनीमध्ये नौकरी करतात. आयुष्यात आणी भविष्यात लॅपटॉपचे जीवनात महत्त्व काय आहे याची जाण असलेल्या शिवाजी बोडखे यांनी सद्यस्थितीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची गरज असल्याचे लक्षात आले, व आपल्या शाळेत लॅपटॉप नाही.
त्यामुळे चांगल्या दर्जाचा लॅपटॉप शाळेला भेट देऊन त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने उदारमताने शाळेला एक लॅपटॉप देऊन विद्यार्थ्यांबद्दल असलेले सहानुभूती यावरून लक्षात येते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामराव सूर्याची बोडखे हे होते.याबद्दल गावकऱ्यांनी इंजिनियर साहेबांचे यावेळी मनापासून स्वागत केले आणी समाधानही व्यक्त केले. तसेच शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबाबत ऋणानुबंध कायम असावेत हा सुद्धा या लॅपटॉप देण्याच्या उद्देशामागे जवळीत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन धोंडू बोडखे ,रामजी बोडके (माजी सरपंच) रामराव गुरुजी,ओम भागवत बोडखे,श्याम बापू बोडखे, तुकाराम बोडखे, बबन नरवाडे, ओम बोडखे, प्रल्हाद वरकड, संदीप दांदडे, लक्ष्मण दांदडे, अमोल घायाळ, रामेश्वर बोडके, परमेश्वर बोडखे, आदिनाथ बोडखे इत्यादी गावकरी मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वाढे (शिक्षक) व आभार प्रदर्शन महादेव वाढे (शिक्षक) यांनी केले.