महाकालेश्वर कावड मंडळाची बोरखेडी ते लोणार पदयात्रेला प्रारंभ.

 

 

नारायणराव आरु पाटील/ प्रतिनिधी

 

रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील जय श्री महाकालेश्वर मंडळ यांची कावड यात्रा दिनांक १२ ऑगस्ट ला बोरखेडी येथून निघाली असून लोणार सरोवर येथे जाणार आहे .यामध्ये अनेक नवतरुण सहभागी होऊन श्रावण महिन्यात हे महाकालेश्वर कावड मंडळ दरवर्षी अनेक तीर्थक्षेत्रावर तिर्थ आणण्यासाठी जात असते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा बोरखेडी ते लोणार या पदयात्रेत ही नवतरुण मंडळी बोरखेडी येथून निघाली आहे. जागतिक लोणार सरोवर येथे जाऊन परत बोरखेडी येथे लोणार येथील धारेचे तीर्थ घेऊन परतणार आहे.