jalna accident : गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांचीजीप विहिरीत कोसळल्याने सातजणांचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने सातजणांचे प्राण बचावले. ‘जालना-राजूर’ jalna -rajur मार्गावरील वसंतनगर शिवारात गुरुवारी सायंकाळी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात जीपचालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गाव अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असतानाच वारकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
चनेगाव आणि तपोवन chanegaon ani tapovan येथील भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर pandharpur येथे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन ते बसने गुरुवारी दुपारी जालना शहरात आले. त्यानंतर एका जीपमध्ये बसून ते गावाकडे निघाले होते. जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली. दरवाजाची काच फुटल्याने जीपचालक बाहेर आला. शेतात काम करणारे नागरिक मदतीला धावून आले.
अशी आहेत मृत व जखमींची नावे :
प्रल्हाद उत्तम महाजन (वय६०), नंदाबाई बाळू तायडे (३५), प्रल्हाद आनंद बिटले (६५), नारायण किसन निहाळ (४५), चंद्रभागाबाई अंबादास घुगे (सर्व रा. चनेगाव, ता. बदनापूर), ताराबाई भगवान मालुसरे (रा. तपोवन, ता. भोकरदन) या सहा वारकऱ्यांचा समावेश आहे, तर रंजना कैलास कांबळे (३५, रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना) ही मृत महिला प्रवासी म्हणून जीपमध्ये बसली होती. हिम्मत चव्हाण, भगवान मालुसरे, ताराबाई गुळमकर, सखुबाई महाजन (रा. तपोवन), आरती तायडे, अंबादास घुगे (रा. चनेगाव), अशोक पुंगळे (रा. राजूर) हे सातजण बचावले आहेत. जखमींवर राजूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.