Bus accident : धावत्या बसमध्ये चालकाला फिट आल्यामुळे बस झाली पलटी.

Bus accident
Bus accident

 

Bus accident : धावत्या गाडीत चालकाला फिट आल्याने वैराग-पुणे एसटी बस उलटून २८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना माढा तालुक्यातील पिंपळनेरजवळ शुक्रवारी सकाळी ९:५० वाजेच्या सुमारास घडली. जखमी प्रवासी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत.कुडूवाडी आगाराची एसटी बस (एमएच १४ बीटी ०९७२) घेऊन चालक नवनाथ गोरख कळसाईत व वाहक प्रशांत गोवर्धन नाईकनवरे हे वैराग बस स्थानकावरून शुक्रवारीसकाळी ७:४५ वाजता पुण्याकडे रवाना झाले.

 

 

 

अर्ध्या तासात कुडूवाडी- टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीतून जात असताना चालकाला अचानक फीट आली. यामुळे बसवरील त्याचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. त्यामध्ये चालक व वाहकही किरकोळ जखमी झाले. यावेळी आसपासच्या लोकांनी बसच्या खिडकीच्या काचा तोडून आतील प्रवाशांना बाहेर काढले