Instagram love : ऑनलाईन केली मैत्री आणि लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार !

sambhaji nagar latest news

Instagram love : इन्स्टाग्रामवर instagram भेटलेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच तिच्यावर वारंवार अत्याचार केले. एवढेच नव्हे, तर एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात करून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. विनय गायकवाड vinay gaikwad (रा. सिडको, एन ६) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २९ मार्च रोजी धूलिवंदननिमित्त आरोपीने तिला बळजबरीने मद्यपान करण्यास सांगितले.

 

 

 

यानंतर, मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळील निर्जन परिसरात त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, मला तुझ्यासोबत लग्न करायचे, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर, तो तिच्यासोबत मकरायचा. त्याचे व्हिडीओ चित्रण तो त्याच्या मोबाइलवर करायचा. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तो देत असे.द्यपान करायचा, पीडिता नशेत असताना तो तिच्यावर अत्याचार rape करायचा. त्याचे व्हिडीओ चित्रण तो त्याच्या मोबाइलवर करायचा. हे ‘व्हिडीओ व्हायरल’  करण्याची धमकी तो देत असे.

 

 

 

गर्भपातही केला

■ गर्भवती असल्याचे समज- ल्यानंतर पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तेव्हा त्याने खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला.

■ यानंतर, तिने वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह केला असता, त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली.

■ या दरम्यान, नातेवाइकांनी त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळविले. हा प्रकार पीडितेला समजातच, तिने २९ जून रोजी त्याच्यावि- रोधात पोलिसांत तक्रार नोंदविली.