honey trap : आचोळ्यात राहणाऱ्या वृद्धाला हनी ट्रॅपमध्ये honey trap अडकवून अश्लील क्लिपच्या आधारे त्यांच्याकडून तब्बल ३४ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी तरुणीसह दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आचोळ्यात राहणारे ६९ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त असून, २८ एप्रिलला त्यांना कुटुंब नावाच्या अॅपवरून प्रियांका शर्मा priyanka sharma नावाच्या तरुणीने संपर्क साधला होता. प्रियांकाने त्यांना गोड बोलण्यात गुंतवून हनी ट्रॅपमध्ये honey trap अडकवले.
तिने स्वतःचा ‘अश्लील व्हिडिओ’ पाठवला आणि त्यांनादेखील तसाच व्हिडिओ पाठविण्यास सांगितले. तिच्या जाळ्यात फसल्यानंतर प्रियांकाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तेव्हा घाबरून त्यांनी प्रियांकाचा नंबर डिलीट करून तिला ब्लॉक केले. प्रियांकाचा नंबर ब्लॉक केल्याने हे प्रकरण शांत झाले असे त्यांना सुरुवातीला वाटले. मात्र लगेच त्यांना रामकुमार मल्होत्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगून हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी या वृद्धाकडून ३४ लाख रुपये उकळले. पैशांची मागणी वाढतच राहिल्याने अखेर त्यांनी आचोळे पोलिस ठाणे
गाठले.