भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षारक्षकांची राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या !

आमदार श्वेता महाले

 

 

भाजपा आमदार श्वेता महाले shweta mahale यांच्या सुरक्षारक्षकांची राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या ! चिखलीच्या chikhali आमदार तथा भाजपच्या नेत्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील shwetatai vidyadhar mahale patil यांना देण्यात आलेल्या शासकीय सुरक्षा रक्षकाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना आज बुलढाणा buldhana येथे पोलीस वसाहतीत घडली. त्यांनी डोक्यात शासकीय बंदुकीतून गोळी झाडून घेतली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण मात्र समजू शकले नाही.

 

 

 

‘अजय गिरी’ ajay giri असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून, रक्ताच्या थारोळ्यात त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, गिरीयांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते आमदार निवास किंवा कार्यालयात गेले नव्हते. आ. श्वेताताई महाले shwetatai mahale यांना राज्य सरकारने सशस्त्र सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अजय गिरी ajay giri हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत होते. आज बुधवार ३१ जुलै रोजी त्यांनी अचानक त्यांच्या बुलढाणा buldhana येथील पोलिस वसाहतीत असलेल्या निवासस्थानी स्वतःवर शासकीय बंदुकीतून गोळी ळी झाडून घेतली.

 

 

 

 

ही घटना शेजारच्यांना माहिती कळताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना कल्पना दिली, तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरी यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी शर्थिचे प्रयत्न करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, उपचारादरम्यान गिरी यांची प्राणज्योत मालवली. गिरी यांनी आत्महत्या का केली ? याबाबतचा तपास बुलढाणा पोलिस buldhana police करत आहेत. त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबीक किंवा वैयक्तिक कारण असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, या घटनेने बुलढाणा  पोलिस buldhana police  दलात एकच खळबळ उडाली असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

 

 

 

तसेच, कुटुंबीयांना धीर दिला व तपासाबाबत सूचना केल्या होत्या. दरम्यान, याघटनेची माहिती आ. श्वेताताई महाले shwetatai mahale  यांच्या कार्यालयातील सहकारी वर्गाला कळताच त्यांनाही मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती आ. श्वेताताई महाले पाटील shwetatai mahale patil यांनाही देण्यात आली. अजय गिरी हे पोलीस दलात मुंबईला भरती झाले होते, २०१७ मध्ये त्यांची बुलढाण्याला बदली होऊन पोलीस मुख्यालयातून त्यांना आ. श्वेताताई महाले यांचे अंगरक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. अवघ्या ३८ वर्ष वयातच त्यांनी त्यांचे जीवन संपवले. त्यांना पत्नी व एक मुलगा आहे. या घटनेची बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम १९४ बीएनएस एस (२४) २०२४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

या संकट समयी आपण गिरी परिवारासोबत

चिखली: आ. श्वेताताई महाले shwetatai mahale यांचे शासकीय सुरक्षा रक्षक अजय गिरी ajay giri यांचे बुधवारी बुलढाणा येथील पोलीस वसाहतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दुर्दैवी निधन झाले. गिरी यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात व धक्कादायक निधनाबद्दल आ. महाले यांनी दुःख व्यक्त केले आहे. माझी सावली बनून सदैव माझ्या सुरक्षेत दक्ष असलेले माझे सुरक्षारक्षक पोलीस बंधू अजय गिरी यांचा आज दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या अशा अकाली व धक्कादायक निधनाने मला अतिशय दुःख झाले असून गिरी परिवारावर देखील दुःखाचा पहाड कोसळला आहे. या संकट समयी मी गिरी परिवारासोबत आहे आणि सदैव राहील. स्व. अजय गिरी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! अशा भावूक शब्दात आ. श्वेताताई महाले shwetatai mahale यांनी अजय गिरी यांच्या धक्कादायक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.