शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या ग्रामसेवकास आर्थिक देवाणघेवाण करून केला चुकीचा सर्वे ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

 

ग्रामसेवकास

 

 

 

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या ग्रामसेवकास आर्थिक देवाणघेवाण करून केला चुकीचा सर्वे ; अशा ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी तालुक्यातील बावनबीर bavanbir साझ्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा चुकीचा सर्वे केल्याप्रकरणी ग्रामसेवकास gramsevak निलंबित करण्यात यावे तसेच आपदग्रस्त निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा सचिव श्याम अकोटकार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnvis यांच्याकडे केली आहे. खामगाव khamgaon येथे दौऱ्यावर आले असताना फडणवीस यांना हे निवेदन सादर करण्यात आले.

 

 

 

बावनबीर bavanbir परिसरात जास्तीत जास्त फळांचे उत्पादन येथील शेतकरी घेतात. २४ फेब्रुवारी रोजी ‘गारपीट’ झाली. तसेच अवकाळी झाला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामा करण्यासाठी ग्रामसेवकास नियुक्त करण्यात आले. मात्र, आर्थिक देवाणघेवाण करून चुकीचा सर्वे करण्यात आल्याचा आरोप ग्रामसेवकावर करण्यात आला आहे. १०२.८४ पैकी ५०.९५ हेक्टर बाधित क्षेत्र दाखवून १८०३४२० रुपयांचे फळपीक नुकसान दाखविण्यात आले. प्रत्यक्ष पाहणी न करता हे सर्वेक्षण करण्यात आले. यादीमध्ये पात्र लाभार्थीना वागळून अपात्रांना स्थान देण्यात आले. वरिष्ठांचे आदेश डावलून मनमानी करणाऱ्या ग्रामसेवकास निलंबित करावी आणि आपद्ग्रस्त निधीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.