Gold news : गेल्या आठवड्यापासून चांदीच्या silver भावात वाढ सुरू असून सोमवारी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. ८ जूननंतर चांदीचे भाव पुन्हा एकदा ९२ हजारांच्या पुढे गेले आहेत. दुसरीकडे सोमवारी सोन्याच्या भावात gold rate ३०० रुपयांची घसरण होऊन ते ७३ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
जून महिन्यात घसरण झालेल्या ‘चांदीच्या भावात’ जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा वाढ सुरू झाली. ८ जूनला चांदी ९२ हजार २०० रुपये प्रति किलोवर होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले व २९ जूनपर्यंत ती ८८ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली होती. १ जुलैला २०० रुपयांच्या वाढीने ती ८८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.