वाशीम जिल्हा प्रतिनिधी / नारायणराव आरु पाटील
दि.२०/९/२०२४ ला हिंगोली जिल्ह्यातील आमला या गावातील श्री संत नामदेव महाराज पालखी दिंडी सोहळ्याची शेगावकडे (shegaon) पायदळ दिंडी मार्गस्थ होत असतांना रिठद येथे आगमनानिमित्त सर्व दिंडीकरी व दिंडीत सहभागी असलेल्या सर्व महिला पुरुष भक्तांना रिठद येथील गजानन अशोक बोरकर व सहकारी , गावातील मंडळींच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज सभा मंडपामध्ये सर्वांची जेवणाची व्यवस्था केली व सर्वांना जेवण देऊन संत नामदेव महाराज यांची दिंडी संत गजानन महाराज शेगावकडे मार्गस्थ झाली. रिठद येथे नेहमी कोणत्याही दिंडीचे आल्यानंतर स्वागत केले जाते व त्यांना जेवणाचाही आस्वाद गावकरी मंडळी कडून दिल्या जातो. त्यामुळे येणाऱ्या -जाणाऱ्या सर्व पायदळ वारकऱ्यांना अन्नदान करून समाधान मिळते. आणि सेवा व पूण्य सुद्धा घडते.