चिखली (बुलढाणा) | २९ मार्च २०२६
इंधन टंचाईच्या चर्चांदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली येथे पाण्याच्या खुल्या टाकीत तब्बल 200 लिटर डिझेल साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी संबंधित पेट्रोल पंप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागात गॅस आणि इंधन टंचाईच्या चर्चा वाढत असताना नागरिकांकडून साठेबाजी वाढल्याचेही चित्र आहे. अशा परिस्थितीत चिखलीतील हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पेट्रोल पंपावर पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात डिझेल साठवून ठेवण्यात आले होते. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार तहसीलदारांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, संबंधित पेट्रोल पंप मालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिखली शहर पोलिस ठाण्यात BNS कलम 223 आणि 287 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे आणि साठेबाजी टाळावी.
👉 संबंधित बातम्या:
- धावाधाव थांबवा! पेट्रोल-डिझेल टंचाई नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा
- धक्कादायक अफवा फोल! देशात पेट्रोल-डिझेल टंचाईच नाही – सरकारचा मोठा खुलासा
- धक्कादायक वास्तव! साखरखेर्ड्यात डिझेल टंचाईमुळे शेकडो ट्रॅक्टर थांबले, शेतीची कामे खोळंबली
👉 अधिक अपडेटसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा.










