dharmaveer ananad dighe divyang yojana : दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बाल कल्याण mahila v baal kalyan योजनेंतर्गत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे ४० ते ८० टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य’ योजनेंतर्गत एक रकमी अर्थसाहाय्य करण्यात येत आहे. २०२४ ते २९ या पाच वर्षांच्या कालावधीकरिता या योजनेंतर्गत दरमहा एक ते तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत सुमारे ६० हजार दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दरवर्षी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील दिव्यांगांना या योजनेचा लाभ घेता येईल.
असा करावा अर्ज
या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी पात्रतेचे निकष, योजनेच्या अर्टी- शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाही. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे sudhakar shinde यांनी केले आहे.