
Buldhana news : मानसिक दृष्टया विकलांग महिलेवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपीस १० वर्षाचा सश्रम कारावास. आज दि. २५/०७/२०२४ रोजी खामगांव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश क्र. २ पी. पी. कुलकर्णी यांनी मानसिक दृष्टया विकलांग महिलेवर बलात्कार प्रकरणी कलम ३७६ (२) (जे) (एल) भा.द.वी अंतर्गत आरोपी सोपान गजानन रसाळे पास १० वर्ष सक्तमजुरीची व २१५००० रूपये दह अशी शिक्षा सुनावली आहे.उपरोक्त प्रकरणातील घटना पोलिस स्टेशन तामगांव अंतर्गत दिनांक १४/११/२०२० रोजी घडली होती. सदर प्रकरणात पिडिताच्या आईन/फिर्यादी यांनी रिपोर्ट दिला होता की, यांची मुलगी पिडीता वय वर्षे २१ ही लहानपणापासून मानसिक दृष्ट्या विकलांग आहे.
घटनेच्या दिवशी ती पिडितासह गावातील हातपंपावर पाणी भरण्यास गेली होती व एक पाण्याचे भांडे हातपंपावर राहिले होते तेवढे भरून आणण्यासाठी तिने पिडितेस हातपंपावर पाठविले होते. परंतु ती खूप उशीर झाला तरी परत आली नाही म्हणुन ती तिला शोधण्यास गेली तेव्हा तिला पिडीताच्या ओरडण्याचा आवाज आता व आवाजाच्या दिशेने तो मेली असता आरोपी सोपान रसाळे हा तिच्या गावातील राहणारा इसम तिच्यावर एका संडासामध्ये पिडितेस खालीपाडुन तिचेवर बलात्कार करीत होता. तिने सदरची पटना पाहताच आरोपीस सापटमुक्त्यानी मारून व बाजुला केले तेव्हा तो तेथुन पळून गेला आणि ती पिडितेस घेवुन घरी आली.
तिने मुले घरी आल्यावर तिने सदरची घटना मुलांना सांगितले व पोलीस स्टेशनला जावुन सदर घटनेचा रिपोर्ट दिला, सदरच्या रिपोर्टवरुन सोपान गजानन रसाळे वय ३४ वर्षे, याख्या विरुषद अं.प.क. २८८/२०२०, कलम ३७६ (२) (जे) (एल) भा.दं.वी नुसार, दिनांक १४/११/२०२० रोजी रात्रीच दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उप निरिक्षक श्रीकांत विखे, पी.स्टे. तामगांव, ता संग्रामपूर यांनी करून दोषारोपपत्र वि जिल्हा व सत्र न्यायालय, खामगांव येथे दाखल केले.
सदर प्रकरणाची सुनावणी खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायाधीश २ तथा विषेश न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव श्री.पी. पी. कुळकर्णी यांच्यासमोर करण्यात आली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ०८ साक्षिदाराची साक्ष नोंदविण्यात आली त्यात फिर्यादी व पिडिता आणि पिडिताचा भाउ व वैदयकिय अधिकारी डॉ. संध्या किनकर व विशेष शिक्षक राजेश चव्हाण यांनी साथ महत्वाची ठरली. उपरोका प्रकरणात वि न्यायाधीश श्री. पी. पी. कुळकर्णी यांनी आरोपी विरूध्द कलम ३७६ (२) (जे) (एल) भा.दं.वी. मध्ये दोषारोप सिध्द झाल्याने आरोपी सोपान गजानन रसाळे पास कलम ३७६ (२) (जे) (एल) भा.दं.वी. प्रमाणे १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याच्या सत्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीने दंडाची रक्कम वि न्यायालयास भरणा केल्यास दंडाच्या रक्कमेपैकी २० हजार रूपये पिडिता व तिच्या कुटुंबियास नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावी असा आदेश विदयमान न्यायालयाने केला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरीक्त शासकीय अभियोक्ता कु. रजनी डी. बावस्कार (सौ. भालेराव) यांनी कामकाज पाहिले. तसेच सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामगांव, ता. संग्रामपुरचे पो है. कॉ. अमर कस्तुरे बन १२४८ यानी कोर्ट पैरवी माणून काम केले आहे.