धामणगाव बढे : शेतामध्ये मका पिकावर फ्युरी हाताने टाकताना आठ जणांना ‘विषबाधा’ झाली असून, त्यामधील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दामोदर नारायण जाधव damodhar narayan jadhav (वय ७०) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, तीन महिलांसह एक मुलगा गंभीर असून, त्यांच्यावर बुलढाणा buldhana जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन जणांवर धामणगाव बढे dhamangaon bedhe येथे प्रथमोपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.
यामध्ये मोहन देवानंद जाधव mohan devanand jadhav (वय १२), कांता देवानंद जाधव (३८), बेबीबाई शिवाजी जाधव (५७), सुभाबाई लक्ष्मण जाधव (६०) यांचा समावेश आहे. फ्युरी टाकत असताना दुपारी दोनच्या दरम्यान सर्व आठ जणांना चक्कर येणे व मळमळ होणे असा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली, तर दामोदर नारायण जाधव damodhar narayan jadhav हे गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने बुलढाणा buldhana जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दुसरीकडे धामणगाव बढे dhamangaon bedhe येथील फ्युरीमध्ये कार्बोफ्युरान विषारी घटक फ्युरीमध्ये कार्बोफ्युरान हा विषारी घटक असून, त्याचा वापर करताना नाका-तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. फ्युरी टाकत असताना त्याचा गॅस बनतो. तो विषारी असतो. तसेच हवेच्या विरुद्ध दिशेने पिकांवर टाकताना काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत नियमित केले जात असते. मका पिकावरील अळीपासून कीड रोखण्यासाठी शेतकरी याचा वापर मोठ्या प्रमाणात करीत असतात.