देऊळगाव राजा|१० एप्रिल २०२६
कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आलेल्या शुभमने कार्यक्रमानंतर मित्रांसोबत वॉटरपार्कमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पोहण्याच्या दरम्यान तो अचानक पाण्यात बुडाला. काही वेळाने त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वॉटरपार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशिक्षित लाइफगार्ड उपस्थित होते का, आपत्कालीन साधने उपलब्ध होती का, याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त होत आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वॉटरपार्कमध्ये मोठी गर्दी होत असताना अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे सदावर्ते कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित वॉटरपार्कच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी देखील केली जाणार आहे.
Related News
- मलकापुरात ‘१ लाख द्या, ९ लाख घ्या’ घोटाळा उघड! नकली नोटा टोळीचा पर्दाफाश; पोलिसांवरच प्रश्नचिन्ह
- मेहकर तालुक्यातील लोणीगवळी हादरलं! ५ ते ९ वर्षांच्या मुलींचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; गावात संतापाचा उद्रेक
- रक्षकच भक्षक! पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात खाकीची अब्रू धुळीस
हे आवश्यक करा
अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा. ही बातमी आपल्या मित्रांसोबत शेअर करा.











