हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगाव राजा: AI आणि मशीन लर्निंगमधून स्टार्टअपच्या नव्या संधी; राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

On: October 13, 2026 7:02 AM
Follow Us:
AI आणि मशीन लर्निंग राज्यस्तरीय कार्यशाळा
देऊळगाव राजा|मनोहर खंदारे

देऊळगाव राजा येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधींवर मार्गदर्शन करणारी राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळा पार पडली. श्री व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा आणि संत भगवानबाबा महाविद्यालय, सिंदखेड राजा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

‘एआय अँड एमएल फॉर फ्युजन ऑफ इनोव्हेशन अँड स्टार्टअप सेंटर’ हा या कार्यशाळेचा विषय होता. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग, इनक्युबेशन व स्टार्टअप केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि त्यातून स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा या आयोजनामागील उद्देश होता.

कार्यशाळेचे उद्घाटन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संतोष कुटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता केवळ संगणक क्षेत्रापुरता मर्यादित नसून कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि बँकिंग अशा विविध क्षेत्रांत वाढत असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात पिकांवरील रोगांचे निदान, माती परीक्षण, हवामानाचा अंदाज आणि बाजारभावाचे विश्लेषण यांसाठी AI आधारित स्टार्टअप सुरू करण्याची मोठी संधी असल्याचे मत डॉ. कुटे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयांतील इनक्युबेशन केंद्रांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापुरते मर्यादित न राहता स्वतःचे उद्योग उभारण्याचाही विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

मुख्य मार्गदर्शक म्हणून संत भगवानबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वळसे यांनी स्टार्टअप क्षेत्रातील विविध संधींबाबत माहिती दिली. स्टार्टअप सुरू करण्यासाठी केवळ अभियांत्रिकी किंवा संगणकशास्त्राचे शिक्षण आवश्यक नाही. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांतील विद्यार्थीही आपल्या कौशल्याच्या आधारे व्यवसाय उभा करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

कंटेंट क्रिएशन, डिजिटल मार्केटिंग, पर्यटन, भाषांतर, फिनटेक तसेच जीएसटी आणि करसंबंधित सेवा यांसारख्या क्षेत्रांतही नवउद्योजकतेच्या संधी असल्याचे डॉ. वळसे यांनी उदाहरणांसह सांगितले.

समारोपीय सत्रात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीडचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना अचूकता, नैतिकता आणि समाजोपयोगी दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी स्थानिक समस्या ओळखून तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय शोधावेत आणि रोजगारनिर्मितीच्या संधी विकसित कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रूपाली तेलगड यांनी केले. अतिथींचा परिचय IQAC समन्वयक डॉ. एकनाथ भालेराव आणि डॉ. महेश तांदळे यांनी करून दिला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले-देशमुख यांनी, तर मार्गदर्शन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. निलेश काकडे यांनी केले. समारोपीय सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनंत आवटी यांनी केले.

श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव आणि प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी झाली. आयोजनासाठी प्रा. पवन कदम आणि तांत्रिक चमूने परिश्रम घेतले. या राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागांतील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा!

स्थानिक बातम्या, शिक्षण, सरकारी योजना, शेती आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

✅ WhatsApp ग्रुप जॉइन करा

📰 संबंधित बातम्या

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

देऊळगाव राजा दुहेरी हत्याकांडाला नवे वळण; दोन FIR, दोन मृत्यू अन् सर्व आरोपींना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील

KattaNews.in सोबत जोडलेले राहा

देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा →

मनोहर खंदारे

मनोहर खंदारे हे कट्टा न्यूजचे प्रतिनिधी असून महाराष्ट्रातील स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींवर बातम्या देतात. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाच्या घटनांची अचूक व विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चौथा गाव बुलढाणा येथे पाणीपुरवठ्याबाबत ग्रामस्थांची तक्रार

बुलढाणा तालुक्यातील चौथा गावात रात्री १० वाजता पाणीपुरवठा; पाण्याच्या अपव्ययाबाबत ग्रामस्थांची नाराजी

साखरखेर्डा मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळील प्रस्तावित पूल

साखरखेर्डा–मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावाजवळील पुलासाठी १० कोटी मंजूर; अंकूर देशपांडे यांच्या पाठपुराव्याला यश

मेहकर चौफुली बायपासवरील अपघाताच्या बातमीसाठी प्रतिनिधिक छायाचित

मेहकरमध्ये भीषण अपघात; माजी सैनिक अच्युतराव शिरसाट यांचा जागीच मृत्यू, रुग्णवाहिकेच्या उशिरावर संताप

देऊळगाव राजा श्री बालाजी यात्रा नियोजन बैठक

देऊळगाव राजा श्री बालाजी यात्रा नियोजनाला वेग; भाविकांसाठी अल्पदरात भोजन, पाणपोई अन् इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा

देऊळगाव राजा श्री व्यंकटेश महाविद्यालयातील अभिजात मराठी भाषा सप्ताह कवी संमेलन

देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

Leave a comment