सिंदखेडराजा | २५ फेब्रुवारी २०२६
कठीण परिस्थितीतून संघर्ष करत यश मिळवत लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नागपूर येथे समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र दीपक मांटे यांचा 23 फेब्रुवारी रोजी लोकसेवा नशामुक्ती व्यसनमुक्ती केंद्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्याने तालुक्याच्या अभिमानात भर पडली.
लोकसेवा नशामुक्ती व्यसनमुक्ती केंद्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेताना त्यांनी केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. आतापर्यंत या केंद्रातून 1000 पेक्षा अधिक युवकांनी दारूचे व्यसन सोडले असून समाज परिवर्तनासाठी हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे पाटील यांच्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रताप दादा मोरे यांच्या हस्ते दीपक मांटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे, तालुका अध्यक्ष गणेश पंजरकर, पत्रकार अहमद कुरेशी, जुबेर शहा, काळे, पिंपळगावचे माजी उपसरपंच बंडू ठाकुर तसेच व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे उपस्थित होते.
दीपक मांटे यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा, समाजसेवा आणि प्रशासनिक सेवांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हे पण वाचा..
📢 तुमच्या भागातील बातम्या आम्हाला पाठवा
स्थानिक घडामोडी, समस्या किंवा प्रेरणादायी बातम्या आम्हाला 9561475736 वर पाठवा.
Kattanews.in — तुमच्या आवाजाला व्यासपीठ










