Crime news : बदलापूरचे badlapur प्रकरण ताजे असतानाच पुण्यात एका तरुणीच्या निघृण खुनाची घटना समोर आली आहे. तरुणीचा शीर धडावेगळे केलेला आणि हात-पाय कापून टाकलेला भीषण अवस्थेतील मृतदेह खराडीमध्ये kharadi नदीपात्रात आढळून आला आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्षे असल्याची माहिती चंदननगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
खराडी kharadi परिसरात जेनी लाइट कन्स्ट्रक्शनकडून इमारतीचे काम सुरू आहे. नदीपात्रात तरुणीचा ‘मृतदेह’ वाहून आल्याचे बांधकाम मजुरांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, खुनी नराधमाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.