crime news : आपल्याशी बोलत नाही, भेटत नाही. प्रेमाला नकार देते. दुसऱ्याच कोणाबरोबर तरी संबंध असावेत, या संशयातून ‘ठाण्यातील’ प्रियांका तायडे priyanka tayde (वय २६) या मैत्रिणीचा खून करणाऱ्या प्रवीण संजय कोळी pravin sanjay koli (३३) याला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी बुधवारी दिली. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या प्रियंकाचा घटस्फोट झाल्याने ती एकटीच राहत होती. जळगावातील पूर्वाश्रमीचा तिचा प्रवीण हा तिच्याशी काहीही कारण करून संपर्क करण्याच्या प्रयत्नात होता.
मात्र, ती त्याच्याशी बोलणे टाळत होती. त्याला भेटतही नव्हती. या सर्वच कारणामुळे त्याचा तिच्यावर राग होता. याशिवाय, तो तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. यातून ३ ते ७ जुलैदरम्यान तिच्या ‘ठाण्यातील’ thane घरात शिरून तिच्यावर चाकूचे वार करून पलायन केल्याची कबुली कोळी koli याने दिली. त्याला ९ जुलैला रात्री अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.