crime : कंपनीचे गेट न उघडल्याने कर्मचाऱ्याने सुरक्षारक्षकाची लोखंडी रॉडने केली हत्या !

 

 

 

crime

 

 

 

crime : कंपनीचे प्रवेशद्वार न उघडल्याच्या संतापातून एका कर्मचाऱ्याने तेथील ‘सुरक्षारक्षकाची’ लोखंडी रॉडने मारहाण करीत हत्या केली. या प्रकरणात कंपनीच्या मालकांनी गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करीत पोलिसांची दिशाभूल केली होती. अगोदर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, चौकशीनंतर सुरक्षारक्षकाची हत्या झाल्याची बाब समोर आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

 

 

 

एमआयडीसीमध्ये उज्ज्वल इस्पात प्रायव्हेट कंपनी आहे. तेथे ८ ऑक्टोबर रोजी कमलेश रामसुजन पटेल (५०) यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेण्यात आले होते. चौकशीदरम्यान ही हत्या असल्याची बाब स्पष्ट झाली. ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता कंपनीचे प्रवेशद्वार लवकर उघडले नाही, यावरून मनोहर ऊर्फ मनोज बबन बेंडे (४२) याने पटेल यांची लोखंडी रॉडने प्रहार करीत हत्या केली होती. त्यानेच त्यांना सुरेश चंदानी व धर्मेश चंदानी यांच्या सांगण्यावरून मेडिकलमध्ये खोट्या नावाने नेले. १० ऑक्टोबरला पटेल यांचा मृत्यू झाला.