चिखली|२२ फेब्रुवारी २०२६
चिखली नगर परिषद 2025 मधील विजयी महिला नगरसेविका, महिला नेतृत्व आणि स्त्री शक्ती चिखली या संकल्पनेला बळ देणारा भव्य सत्कार सोहळा चिखली येथे उत्साहात पार पडला. भारतीय स्त्री शक्ती शाखा – चिखली आणि महिला मंडळ संचालित भगिनी निवेदिता वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विजयी महिला नगरसेविकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी घेतलेली दमदार झेप ही केवळ निवडणुकीतील विजय नसून सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे, असे प्रतिपादन आमदार महाले पाटील यांनी यावेळी केले. सत्कारित महिला नगरसेविका संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेने चिखली शहराच्या विकासासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महिलांच्या नेतृत्वाला भक्कम पाठिंबा दर्शविला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नव्या पिढीला नेतृत्वाचे बळ मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सर्व विजयी महिला नगरसेविकांचे अभिनंदन करताना चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. महिला नेतृत्वामुळे स्थानिक प्रशासन अधिक संवेदनशील, पारदर्शक आणि विकासाभिमुख होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
👉 संबंधित बातम्या
- शेगाव नगरपरिषदेत अर्थसंकल्प फेटाळला; नगराध्यक्ष अल्पमतात, राजकारण तापले
- चिखला काकड गावात तणाव! शिवसेना महिला आघाडी नेत्या शिवानी वाघ यांना मारहाण; आत्महत्येच्या स्टेटसनं खळबळ
- शिवजयंती मिरवणुकीत गुंज येथे राजकीय राडा; चौघे जखमी, १९ आरोपींवर गुन्हे दाखल
📢 आपल्या परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.
आपल्या बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क साधा आणि स्थानिक पत्रकारितेला बळ द्या.










