chikhali news : विषारी सापांना पकडून जंगलात सोडून देत त्यांना जीवनदान देणारे म्हणून ‘सर्पमित्रांना’ ओळखले जाते. मात्र, चिखलीत एका सर्पमित्राने आपल्याच मित्राच्या हाती विषारी साप देत वाढदिवसालाच birthday त्याचा बळी घेतल्याचा प्रकार उडकीस आला आहे. यामध्ये येथील गजानननगरमधील संतोष जगदाळे santosh jagdale (३१) या युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत असे की, स्थानिक गजानननगरमधील संतोष देविदास जगदाळे santosh devidas jagdale याचा ५ जुलै रोजी वाढदिवस होता. या पृष्ठभूमीवर सर्पमित्र असलेल्या आरिफ खान रहिस खान arif khan rahis khan याने त्यास वाढदिवस साजरा करण्यासाठी सोबत नेले. त्याच्यासोबत धीरज पंडितकर हा देखील होता. दरम्यान, आरिफ खान याने संतोषच्या हाती विषारी साप देण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान सापाने त्याला चावा घेतल्याने संतोषचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत मृतकाचे वडील देविदास जगदाळे यांनी ८ जुलै रोजी चिखली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरिफ खान रहिस खान, धीरज पंडितकर (रा. गजानननगर चिखली) या दोन्ही आरोपींविरुद्ध कलम १०५, ३ (५) बीएनएसनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय भागवतकर करीत आहेत.