chhatrapati sambhaji nagar : अबब ! १०६ तोळ्यांचे हिरेजडित दागिन्यांची तिजोरीच केली गायब…

chhatrapati sambhaji nagar

chhatrapati sambhaji nagar : गेल्या वीस दिवसांत घरफोड्यांनी शहरवासीयांत भीतीचे वातावरण पसरले. एन-१ सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये अलिशान कारमध्ये आलेल्या चोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून व्यावसायिकाचे तब्बल १०६ तोळे सोने, हिरेजडित दागिने लंपास केले. हनुमाननगरातील hanumannagar ७० तोळ्यांच्या चोरीनंतर १५ दिवसांतली ही दुसरी विक्रमी घरफोडी ठरली. ‘नक्षत्रवाडीत’ nakshtrawadi अक्षरशः हातात शस्त्र घेऊन चोरांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली.

 

 

 

सर्जिकल साहित्याचा व्यवसाय असलेले निखिल सुशील मुथा nikhil sushil mutha है कुटुंबासह एन-१ मधील गरवारे स्टेडियमच्या मागील परिसरात राहतात. शनिवारी रात्री ८ वाजता कुटुंबासह घराला कुलूप लावून प्रोझोन मॉलमध्ये खरेदीसाठी गेले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता घरातील सर्व लाईट सुरू होते व घराचा मुख्य दरवाजा देखील उघडा होता, त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता दागिन्यांची तिजोरीच आढळून आली नाही. शिवाय, आईच्या खोलीत लोखंडी कपाट कापलेले आढळले. त्यांनी अन्य खोल्यांमध्ये पाहिल्यानंतर एका खिडकीचे गज कापून चोरांनी घरात प्रवेश केला. खिडकीतून प्रवेश करून चोरी करुन जाताना मुख्य दरवाजातून चोर निघून गेले.

 

 

 

रेकी’ करून ४० मिनिटांमध्ये चोरी ८ वाजता मुथा कारने मॉलकडे जताना चोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी मॉलमध्ये प्रवेश करताच चोरांनी मॉल समोरून कार वळतून पुन्हा मुथा यांचे घर गाठले. त्यामुळे ‘रेकी’ करून चोरांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. पुढील ४० मिनिटांत त्यांनी अंदाजे ५ ते ७ किलो वजनाची तिजोरी उचलून नेली. आईच्या खोलीतील कपाट कटरने कापून २४ हजार रोख, चांदीचे शिक्के, बाऊल व आताना हॉलमधील मोबाईल घेऊन अलिशान कारमधून पोबारा केला.

 

 

 

 

पाटल्या, डायमंड सेट, पँडेटचेन, मोत्यांचे सेट…

१० तोळ्यांच्या ४ बांगड्या, २० तोळ्यांच्या दोन पाटल्या, ५ तोळ्यांचे दोन कडे, ४ तोळ्यांचे हिरेजडित साखळी, ८ तोळ्यांचे पेडंट व झुमके, ८ तोळ्यांच्या हियांच्या पानांचा सेट व बांगडी, ६ तोळ्यांचा डायमंड सेट, ३ तोच्यांचे ब्रासलेट, २.५ व १ तोळ्याची हियाच्या दोन अंगठी, ४ तोळ्याचे हिंयाचे पॅडेट, ५ तोळ्यांचे ग्रासलेट, ५ तोळ्यांचे मोत्यांचे सेट, ५ तोळ्यांचे हियांचे पॅडेटचेन, ८ तोळ्यांच्या हियाच्या अंगठ्या, १.५ तोळ्यांचे वेढे, १ तोळ्याचे ब्रासलेट, २ तोळ्यांच्या बांगड्या, २ तोळ्यांचे हिऱ्याचे ब्रासलेट.