नारायणराव आरु पाटील/वाशिम
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जलदुर्ग, सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा एकाएकी कोसळला असून सदर कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अनियमित्ता व भ्रष्टाचार झाला. छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे. राजे छत्रपती शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झाली झालेली आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग आणखी कलंक लावणारी बाब गंभीर आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केले होते. भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली पुतळ्याचे बांधकाम झाले असतांना फक्त हा पुतळा आठ महिन्यात अपमानपद स्थितीत कोसळून पडला. हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तृत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अपमान झाला आहे.
या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र भ्रष्टाचार करणाऱ्या व त्या व्यक्तीस अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या लोकासंदर्भात संताप व्यक्त होत असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, त्यामुळे शासनाने अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन दोषी असणारावर आणी जबाबदार व संबधीत लोकांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करावी.आणी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी.ही जनतेच्या वतीने ही मागणी आहे.
दोषीवर कारवाई न झाल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वाशिमचे अध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या मार्गदर्शनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल. अशा आशयाचे निवेदन रिसोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात हे निवेदन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्यामार्फत दिनांक २९ आॅगस्ट रोजी दिलेले निवेदन शासनास पाठवावे असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रिसोड तालुक्याच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शहराध्यक्ष व शहरातील पदाधिकारी तथा ग्रामीण भागातील पदाधिकारी आणी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी मालवण मध्ये घटना घडल्याचा निषेध व रोष व्यक्त केला.