हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चांडस ते नावली रस्त्यांचे अखेर काम सुरू; पत्रकार गोपाल बोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्ग मोकळा

On: December 26, 2025 1:40 PM
Follow Us:
रिसोड तालुक्यात चांडस ते नावली रस्त्याचे सुरू असलेले काम

नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनिधी 

रिसोड : रिसोड तालुक्यातील चांडस ते नावली रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. चांडस ते नावली रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, त्याची दुरवस्था वारंवार नागरिकांच्या तक्रारी आणि बातम्यांमधून समोर येत होती.या गंभीर परिस्थितीची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल साहेब यांनी घेतली. त्यांनी तातडीने उपविभागीय अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता ठाकरे यांना स्पष्ट सूचना देत संबंधित ठेकेदारांना काम सुरू करण्याचे आदेश दिले.

गेल्या दोन महिन्यांपासून अभियंता ठाकरे यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा काम सुरू होण्याबाबत टाळाटाळ होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र अखेर प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे आणि योग्य समन्वयामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

या संपूर्ण प्रक्रियेत विशेष बाब म्हणजे पत्रकार गोपाल बोरकर यांच्या मागे कोणताही राजकीय वरदहस्त नव्हता. केवळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून, वस्तुनिष्ठ बातम्यांच्या जोरावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नांना अभियंता ठाकरे यांच्या माध्यमातून आणि कार्यकारी अभियंता सोनल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले.

चांडस ते नावली रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

📢 नागरिकांसाठी आवाहन

आपल्या परिसरातील प्रश्न, रस्ते, पाणी, वीज किंवा प्रशासनाशी संबंधित समस्या असल्यास KattaNews.in शी संपर्क साधा. तुमचा आवाज आम्ही शासनापर्यंत पोहोचवू.

🔗 संबंधित बातम्या

  • जनगणना 2027 तयारीला वेग; रिसोड तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न.
  • रिसोड येथे बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे महिला बचत गट कर्जवाटप मेळावा; महिलांच्या स्वावलंबनाला बळ.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

Leave a Comment