Buldhana Robbery : बुलढाणा जिल्ह्यातिल साखरखेर्डा sakharkherda यथील वार्ड क्र.५ मधील तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ लाखांपेक्षा जास्त ऐवज लंपास केला आहे. ही घटना ३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली मदनलाल बिसरलाल गोडाले हे मुलीला भेटण्यासाठी २ जुलै रोजी अकोला येथे गेले होते.
परत येत असताना खामगाव येथे मुक्कामी थांबले. ३ जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रथम वार्ड क्रमांक ५ मधील काही घरांच्या कड्या बाहेरुन बंद केल्या. त्यानंतर चोरट्यांनी मिलिंद पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पाच अंगठ्या आणि नगदी १० हजार रुपये लंपास केले. शेजारील गुलाबराव इंगळे यांचे घर फोडून त्यातील ३० हजार लंपास केले. त्यानंतर बाजुलाच असलेल्या मदनलाल बिसरलाल गोडाले यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याची अंगठी पावने दोन तोळे (बाजार भाव १लाख), दोन तोळ्याची साखळी पाच तोळ्याचा राणी हार, दोन तोळ्याची गहू पोत, पाच तोळ्याचा लक्ष्मी हार, ५०० ग्रॅम चांदी, पाच अंगठ्या आणि नगदी रक्कम मिळून बाजार भावाप्रमाणे किमान ११ लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरट्यांनी घरफोडी करुन लंपास केला आहे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे ०४ जुलै रोजी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली तसेच ‘चोरट्यांचा’ शोध घेण्यासाठी डॉग स्कॉडलाही पाचारण करणयात आले होते.