
गंगाधर बोरकर, वाशिम – kattanews network Latest news : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दगडाने ठेचून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द ( Loni) गावात उघडकीस आली. उषा विलास सुर्वे (वय ३५), विलास लिंबाजी सुर्वे (वय ४०) अशी मृतक पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी रिसोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतक उषा हिचा भाऊ अनिल चिमणाजी भोरणे, रा. केसापूर जि. हिंगोली यांच्या फिर्यादीनुसार, अनिल यांची बहीण उषा हिचा विवाह रिसोड तालुक्यातील लोणी खु. गावातील विलास लिंबाजी सुर्वे याच्याशी झाला होता. विलास हा नेहमी उषाच्या चारित्र्यावर संशय घेत असे, या संशयातून तो नेहमी उषा हिला शिवीगाळ व मारहाण करायचा, दरम्यान ५ जुलै रोजी सकाळी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर उषा ही शेतात कामाला गेली.
दुपारी ३ वाजेच्या नंतर विलास हा शेतात जाऊन उषाला मोबाइलमध्ये फोटो काढण्यासाठी मोहरदळा जंगलात घेऊन गेला व त्या ठिकाणी उषाचा दगडाने ठेचून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस कलम १०३, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.पत्नीची निघृण हत्या केल्यानंतर पतीने सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शेतात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी उशिरा उघडकीस आली.
रिसोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी उषाचा मृतदेह रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रिसोड पोलिस तपास करीत आहेत, तर आत्महत्या केलेल्या उषाचा पती विलास याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात हलविला. लोणार पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
Latest news: फोटो काढायचे म्हणून घेऊन गेला जंगलात.
५ जुलैला भांडण झाल्यानंतर विलासने समजूत काढत सोबत छायाचित्र काढण्याच्या बहाण्याने उषाला नजीकच्या मोहरदळा जंगलात नेले. तेथे त्याने आपला डाव साधत दगडाने ठेचून उषाचा खून केला.