buldhana : बिबी पोलिसांनी जनावरे चोरणाऱ्या आरोपीला केले जेरबंद

 

 

buldhana

 

 

बिबि प्रतिनिधि भागवत आटोळे

 

 

दिनांक 21- 10 -2024 रोजी 2/45 वाजताचे सुमारास पोलीस स्टेशन ‘बीबी’ हद्दीत एक बोलेरो पिक अप वाहन संशयित रित्या आढळून आल्याने सदर वाहनाचा पाठलाग बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील परमेश्वर शिंदे ना पोको अरुण सानप भारत ढाकणे यांनी पाठलाग केला असता सदर वाहन हे दुसर बीड येथील समृद्धी महामार्गावर गेल्याने सदर वाहनाचा पाठलाग छत्रपती संभाजी नगर पर्यंत केला छत्रपती संभाजीनगर येथे सावंगी नाका भागात पिकप वाहन हे पोलिसांची नजर चुकवून पसार झाले.

 

 

त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे स्थानिक पोलिसांना माहिती देऊन पोलीस स्टेशन बिबी च्या पथकाने कसुन तपास करून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल सावंगी नाका गणोरी भागात बोलोरो पिकप वाहन व आरोपी चोरून नेलेली जनावरे यांचा शोध घेत असताना जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मोरक्या पोलिसांना मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून पोलीस स्टेशन बिबी हद्दीतील किनगाव जट्टू येथील चोरून नेलेली 5 जनावरे हरसुल भागातून आरोपीच्या कब्जातून पंचा समक्ष जप्त करून मालकांच्या ताब्यात देण्यात आली मुख्य आरोपी शेख रहीम शेख समृद्धीन वय वर्ष 32 रा हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी यास अटक केली.

 

 

 

नमूद आरोपी यास पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्या संबंधाने विचारपूस करून दिनांक23-10-2024 रोजी येथून जनावरे चोरी करणारे आरोपी चोरी करण्यासाठी वापरत असलेले बोलेरो पिकअप वाहन सेंट्रल नाका हद्दीतून जप्त करण्यात आले आहे सदर बाबतीत पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल अपराध नंबर 216/2024 कलम 303 (2)BNS चे गुन्ह्यातील चोरी केलेली चार जनावरे किमत एक लाख 25 हजार रुपये व एक बोलेरो पिकप वाहन किंमत 4 लाख रुपये असा एकूण पाच लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

पोलीस स्टेशन बिबी येथे पोलीस कोठडीमध्ये असलेला आरोपी नामे शेख रहीम शेख खमरुद्दीन वय वर्षे 32 रा हर्सूल ग्रीन पार्क सोसायटी छत्रपती संभाजी नगर याच्याकडे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल जनावर चोरीचे एकूण पाच गुन्हे दिनांक 28- 7 -2024 दाखल असलेले अप नंबर 296/2024 पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे दाखल अप नंबर 145/2024 पोलीस अप नंबर 164/2024 पोलीस स्टेशन नंबर 482/2024 दाखल अप नंबर 210/2024 पोलीस स्टेशन बिबीचे ठाणेदार यांनी उकल करून गुन्हे उघड केले आहे.

 

 

 

सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील इतर आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्या संबंधाने तपास सुरू आहे सदर कार्यवाही माननीय अधीक्षक विश्व पानसरे बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बि बी महामुनी -अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ रामेश्वर शिंदे -पोलीस हेड कॉन्स्टेबल- गजानन चतुर – ना पो का अरुण सानप- पोलीस कॉ भारत ढाकणे -पोलीस कॉ रवींद्र बोरे- पोलीस कॉ यशवंत जवळ -(सायबर सेल) ऋषिकेश खंडेराव यांनी ही कारवाई केली आहे