बुलडाणा जिल्ह्यातील या गावच्या सरपंचांना एक-दोन नव्हे तर चक्क..पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्याविषयीची नोटीस.

 

 

बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथून जवळच असलेल्या उदयनगर या गावचे सरपंच  मनोज लाहोरकर यांना एक-दोन नव्हे तर चक्क पाच  जिल्ह्यांतून हद्दपार करण्याविषयीची नोटीस उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्ट रोजी जारी केली आहे. त्याचा उदयनगर येथील ग्रामस्थांनी निषेध करीत २१ ऑगस्ट रोजी गावात कडकडीत बंद पाळला.उदयनगर येथील लोकनियुक्त सरपंच मनोज लाहोरकर यांना पाच जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची नोटीस एसडीपीओंनी बजावली आहे.

 

 

उदयनगर गावाचा जवळपास २० खेड्यांचा संपर्क येतो. या गावचे सरपंच मनोज लाहोरकर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आढळल्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने पाच जिल्हे हद्दपारची नोटीस बजावली आहे. या कारवाईचा निषेध करत उदयनगर येथील नागरिकांनी २० ऑगस्ट रोजी अमडापूर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन कारवाई रद्द करण्याची मागणी केली, तसेच २१ ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत उदयनगरमध्ये बंद पाळण्यात आला.

 

 

दरम्यान आपल्या विरोधात करण्यात आलेली कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचे सरपंच मनोज लाहोरकर यांनी म्हटेल आहे. माझ्या विरोधातील दोन गुन्हे तपासावर आहेत आणि एक गुन्हा प्रलंबीत असल्याचे ते म्हणाले.