सलमान नसीम अत्तार,चांडोळ / प्रतिनिधी
चांडोळ येथील संतोष रामदास खराटे 37 वर्ष हा शुक्रवारी दुपारी 1 वाजता ग्रामपंचायत मध्ये येऊन ग्रामविकास अधिकारी यांच्याशि हुज्जत घालून अरे तुरे ची भाषा वापरू लागला व तुम्ही अडीच कोटी चा भ्रष्टाचार केला असे बेबून्याद आरोप करु लागला.धाड पोलीस स्टेशन च्या दिलेल्या माहिती नुसार ग्रामविकास अधिकारी संदीप शिंदे याला आरोपी संतोष रामदास खराटे दुपारी 1वाजता येऊन म्हणला कि तुम्ही घरपट्टी व नलपट्टी घेऊ नका.
ग्रामविकास अधिकारी संदीप शिंदे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचे हातातले शासकीय दस्तावेज हिसकावून फेकून दिले व तुम्हाला पाहून घेतु अशी धमकी दिली.व शासकीय कामात अर्थडा निर्माण केला. त्यावरून आरोपी संतोष रामदास खराटे यांच्यावर अपराध नंबर 237/2024
कलम 132(1)353,351(2)भा. न्या. माहिती नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास धाड पोलीस स्टेशन ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनखाली संदीप कायंदे, पोहेकॅ. संदीप सुरडकर करीत आहे.