Buldhana : जमीन विकून बायकोला शिकवलं, सरकारी नोकरी लागल्यानंतर मात्र त्याच बायकोनं नवऱ्याला घराबाहेर काढलं.पतीची पोलिस तक्रार.

Buldhana

 

रामदास कहाळे / सिंदखेडराजा प्रतिनिधी.

 

Buldhana : असं म्हणतात की प्रत्येक कामयाब पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो.परंतु ईथे ह्या कामयाबी स्त्री मागे तीच्या पती देवाचा हात होता. अत्यंत हलकीची परिस्थिती असताना कसलीही कसर न सोडता स्वतःची जमीन विकून बायकोला शिकवले परंतु त्याच बायकोने सरकारी नोकरी (gov. Job) लागल्यानंतर आपल्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या पती  देवालाच घराबाहेर काढले. अशी तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या गुंजाळा या गावातील संजय पवार यांनी पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे दाखल केली.

 

दोन एकर शेती विकली

बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच अशी घटना घडली, चिखली तालुक्यातील गुंजाळा या गावातील संजय पवार यांचे लग्न मामाची मुलगी म्हणजेच पुरुषोत्तम भांड रा. बीबी या.लोणार यांची मुलगी पूजा भांड हिच्यासोबत 2004 मध्ये लग्न झाले. त्यांचा संसार सुरुवातीला अगदी आनंदात सुरू होता. मात्र पत्नी १२ वी विज्ञान शाखेमध्ये पास असल्यामुळे बायकोला समोरील शिक्षण द्यावे असे संजय पवार यांना वाटले त्यामुळे संजय पवार यांनी कशाचीही परवा न करता २ एकर शेती विकून नर्सिंग चा ४ वर्षाचा कोर्स पूर्ण केला, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर पत्नीला आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने नोकरी लागली. ही नोकरी लागल्यानंतर दोघेही खुश होते. ज्या ठिकाणी नोकरी लागली त्या ठिकाणी भाड्याने रूम करून हे दोघेही राहू लागले.

 

उशिरा घरी येत असल्यामुळे वादाला सुरुवात.

महिन्यानंतर पत्नीला आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावुन घेतले असता लगेच काही महिन्यातच पत्नीचे राहणीमान बदलले आणि रात्री घरी उशिरा येण्याचा प्रकार सुरु झाल्याने दोघांमध्ये वाद होऊ लागले. याचेच कारण पुढे करून पत्नीने पती सोबत राहण्यास नकार दिला. वाद मिटविण्यासाठी आम्ही नातेवाईकांना घेवुन गेलो असता पत्नीने साफ नकार देत मला पतीसोबत राहायचे नाही आणि पतीने माझ्याकडे येवुनही पाहू नये अशी ताकीद दिली. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासुन पतीला घरात प्रवेश देत नाही मुलींनाही भेटू देत नाही त्यामुळे पतीची स्वतःची जमीनही गेली आणि दोन्ही मुलीपासुन नजरेआड केल्या. तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी संजय केशव पवार यांनी केली आहे.