buldhana : महावितरणचे शून्य नियोजन ! डोणगाव dongaon येथील विद्युत वितरण कंपनीचे कामकाज डेपाळलेले आहे. कित्येक ठिकाणी नागरिकांना रोहित्रा जवळून जातांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. सताड उपडी असलेली ही ‘रोहित्र’ जीवितहानीस निमंत्रण देणारी ठरत आहेत. त्यामुळे डोणगाव dongaon ग्रामपंचायत सरपंच शिवचरण आखाडे shivcharn akhade यांनी विद्युत वितरण विभागाला पत्र देवून गावातील रोहित्र दुरुस्ती करून सुस्थितीत आणण्याची मागणी केली आहे. डोणगाव येथे विद्युत वितरण कंपनीचा गेल्या काही दिवसांपासून भोंगळ कारभार सुरु आहे. विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गावात लावण्यात आलेले विद्युत रोहीत्रांपासून (डीपी) नागरिकांच्याजिविताला धोका निर्माण झालेला आहे.
कित्येक रोहित्रांमध्ये कट आउट नाहीत, पेट्या सडलेल्या व विना दरवाज्याच्या असून हे रोहित्र गावातील राहवारीच्या रस्त्यांवरच आहेत. तर काही रोहित्र हे शाळा व अंगणवाडी जवळ आहेत. सदर रोहित्राने चिमुकल्याच्या जीवितास भोका निर्माण झाल्याची घटना पूर्वी घडलेली आहे. डोणगाव dongaon येथील स्मशान भूमी जवळील रोहित्र पूर्णपणे वाकलेला असून तो कधीही कोसळू शकतो, असे असतांना विद्युत वितरण कंपनीने यावर कोणत्याह उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच शिवचरण आखाडे यांनी विद्युत वितरण कंपनीला एका पत्रान्वये गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवून रोहित्राची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.