buldhana :आज रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा मध्ये प्रत्येक ठिकाणी गैरप्रकार घडत आहेत.बुलढाण्यात ऑनलाइन टायपिंग परीक्षेत घोळ,घरी बसून सोडवला जात होता पेपर.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने १४ जून रोजी घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेदरम्यान चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बोगसगिरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाइन पद्धतीने २२ विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे दिसून येत असताना परीक्षा केंद्रात प्रत्यक्षात केवळ १४ परीक्षार्थी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सतर्कतेमुळेच हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने buldhana जिल्हाभरात सात परीक्षा केंद्रावरून संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात आली. यादरम्यान चिखली येथील परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या संगणक टंकलेखन परीक्षेसाठी २२ विद्यार्थ्यांनी अॅक्सेस घेतल्याचे ऑनलाइन दिसत होते. मात्र, परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात १४ विद्यार्थीच परीक्षा देत होते.८ विद्यार्थी हे घरूनच परीक्षा देत होते पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयातून शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉल करून केंद्रातील विद्यार्थी संख्येची शहानिशा केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या परीक्षेचा user ID व password हा फक्त केंद्रप्रमुखांकडेच असतो, यापृष्ठभूमीवर केंद्रप्रमुख देखील या गैरप्रकारात सामील असल्याचे स्पष्ट झाले.शिक्षणाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र गाठून परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराची शहानिशा केली. सोबतच जिल्ह्यातील इतर सर्व परीक्षा केंद्रांवर देखील असाच प्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांनी पोलिसात नकार दिली.
buldhana|पोलिसांत गुन्हा दाखल.
■ याप्रकरणी शिक्षण विभागाचे प्रकाश दलसिंग केवट यांनी आरोपी केंद्रप्रमुख गजानन मोतीराम लाघे (रा. चिखली) यांनी इतर लोकांशी संगनमत करून मेल आयडी व पासवर्ड बनावट विद्यार्थ्यांना देऊन शासनाची फसवणूक व पदाचा दुरुपयोग केला. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोपनीयतेचा भंग करून परीक्षेत गैरव्यवहार केल्याची तक्रार चिखली पोलिसात केली. त्यावरून लाघेविरुद्ध षडयंत्र रचून फसवणूक तथा गोपनीयतेचा भंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील करीत आहेत.